Category: Music


In this new year live each day with zest,daily grow and try to be highest and the best!!!

Wishing you all,

Advertisements

तू निरागस चंद्रमा, तू सखे मधु शर्वरी …

चांदने माझ्या मनी ते पसरले क्षितीजावरी…

तू निरागस चंद्रमा, तू सखे मधु शर्वरी …

चांदने माझ्या मनी ते पसरले क्षितीजावरी…

तू निरागस चंद्रमा……..

काजलाचे बोट घे तू लाऊनी गालावरी,

काजलाचे बोट घे तू लाऊनी गालावरी,

मन्मनीचे भाव सारे उमलले चेहेर्यावारी

पाहतो जेव्हा तुला मी गजल उमटे अंतरी

शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी,

तू निरागस चंद्रमा……..

सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी …….

सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी …….

भोवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी

हासता तू सूर ही झंकारले वार्यावरी …..

मी न माझी राहीले ही नशा जादूभरी ….

तू निरागस चंद्रमा . . . . . . . . . . . . . . . . . . ।

Song from the movie “Manini”

 

दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..तडा तडा गार गारा गरा गरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..
थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे मझे तुझ्या मनभर
 

 

 

गीत – संदीप खरे
संगीत – संदीप खरे
स्वर – संदीप खरे
अल्बम – दिवस असे की …. (१९९९)

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते ?
कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

 
 
गीत गुरू ठाकुर
संगीत अजय, अतुल
स्वर शंकर महादेवन
चित्रपट अगं बाई …. अरेच्चा ! (२००४)

 

Song copy-pasted from here