| मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे, का होते बेभान, कसे गहिवरते !आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ? कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते ! मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे, का होते बेभान, कसे गहिवरते ! रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते, |
||
| गीत | - | गुरू ठाकुर |
| संगीत | - | अजय, अतुल |
| स्वर | - | शंकर महादेवन |
| चित्रपट | - | अगं बाई …. अरेच्चा ! (२००४) |
Song copy-pasted from here
